Nilesh Teli
HOME
ABOUT ME
PORTFOLIO
BIRDS
NATURE
ANIMALS
HUMANS & MASTERPIECES
MY LIFE STORIES
GET IN TOUCH
FEAUTURED
Nilesh Teli
HOME
ABOUT ME
PORTFOLIO
BIRDS
NATURE
ANIMALS
HUMANS & MASTERPIECES
MY LIFE STORIES
GET IN TOUCH
FEAUTURED

Sep 23, 2026

“बोलावणं आल्याशिवाय नाही!” — The Lesson That Stayed With Me

9 min read

(P.S. - Please scroll down for Marathi read. Also you can read the lesson in Marathi from image gallery)



There are some lessons we learn in school and forget before we even leave the classroom. And then there are a few that quietly follow us for the rest of our lives. For me, one such lesson came from a Marathi textbook. I don't even remember which standard I was in. I don't remember the examination questions, the marks I scored, or whether I ever wrote an answer about it.

But I remember the title. - “बोलावणं आल्याशिवाय नाही!” (Not unless I am invited.)

Those five words somehow stayed with me. The lesson was a नाट्यछटा by Divakar (https://bit.ly/4cUPUvO). There was a young character who believed that he had earned his place. He had performed, worked hard, received appreciation and recognition—and yet, when he felt he wasn't being given the respect he deserved, he refused to simply go along.

His attitude was almost: “If you need me, call me. I won't come running after you.”

As a schoolboy, I completely understood him. Actually, I was probably 90% on his side. 😄 To me, he wasn't arrogant. He was protecting his self-respect. I remember thinking, Why should he plead? Why should he compromise? If his contribution is valuable, shouldn't people recognise it? And somewhere along the way, without even realising it, I adopted the same philosophy.


I Don't Remember When It Became Mine

As I grew up, “बोलावणं आल्याशिवाय नाही” became almost an unwritten rule in my life. I was never comfortable asking someone for an unnecessary favour. Especially if I felt I was asking for something that wasn't naturally mine. I didn't like saying please just to persuade someone to do something for me. Not because I didn't know how to say it. But because somewhere inside me was this voice: -

“Why should I bow down or plead? If it is rightfully mine, ask me. If it isn't, I don't want it that badly.”

The same philosophy extended, rather amusingly, to girls. 😄 My teenage logic was beautifully simple: Why should I run behind her? If I'm good enough, she'll come to me.

Well...

Nobody came after me during my school days. 😂 But, in all fairness, a couple of them did later in life. So perhaps the theory wasn't entirely useless after all! Or perhaps I was just lucky enough to find a few people who appreciated me without being chased. I honestly don't know.


Was I Right?

Today, when I look back, I don't know. What did I gain because of this attitude? What did I lose? There may have been opportunities I didn't pursue. Relationships I didn't initiate. People I could have reached out to but didn't. Perhaps there were moments when a simple “Can you please help me?” would have opened a door.

Perhaps there were times when I mistook ego for self-respect. I will never know. But one thing I do know. I rarely felt that I had to reduce myself to be accepted by somebody else. And that mattered to me.


The Boy Wasn't Completely Right

With age, I've started seeing that character differently. Perhaps he wasn't completely right. His self-confidence had elements of exaggeration. His sense of importance was probably bigger than reality. His refusal to compromise was, in part, what made the नाट्यछटा amusing.

But when I was a child, I didn't see that irony. I saw a person who had been treated unfairly. I saw someone saying:

“I know what I bring to the table. I won't beg for a place at it.”

And that was the part that stayed. Maybe that wasn't exactly what Divakar intended me to learn. But that's the strange thing about books. We don't always learn what the author intended to teach us. Sometimes we take one sentence, one character, one idea—and build a little piece of our personality around it.


Self-Respect or Ego?

This is the question I ask myself today. Because there is a very thin line between the two.

Self-respect says: ‘I know my worth. I don't have to beg for acceptance.’

Ego says: 'I am too important to ask anyone for anything.'

They can look almost identical from the outside. But they are not. Self-respect gives you dignity. Ego sometimes deprives you of connection. And perhaps growing older is partly about learning to recognise which one is speaking inside your head.


I Still Believe in “बोलावणं आल्याशिवाय नाही”

Funny thing is... Even today, after all these years, I still follow it.

If someone genuinely wants me, I'll be there.

If someone values what I bring, I'll contribute.

If someone invites me with warmth, I'll gladly go.

But I don't want to chase people simply to prove that I deserve a place in their lives. One may call it ego. So be it. I still love that little principle.

But today I would add one more line to it:

बोलावणं आल्याशिवाय नाही.
पण मनापासून बोलावलं असेल, तर अहंकार आड येऊ देऊ नका.

Don't go where you aren't wanted. But when someone genuinely reaches out, don't let your ego stop you from going. Because I have learned something else with age:

Asking isn't always begging.

Saying please isn't always surrender.

Going first isn't always weakness.

Sometimes, reaching out first is simply an expression of courage. And sometimes, saying “I need you” requires much more strength than saying “I don't need anyone.”


Perhaps That Little Lesson Did Something Good After All

I don't know whether “बोलावणं आल्याशिवाय नाही” was the perfect philosophy for life. It probably wasn't. But it gave a young boy something he desperately needed at that age— a sense of self-worth.

It taught me, perhaps a little too strongly at times, that I should never feel smaller just because someone else didn't recognise me. And even today, when I create something, share something, or put a little piece of myself out into the world, that old voice still whispers: Don't beg to be seen.

Create because you have something to say.

Share because you want to connect.

Welcome appreciation when it comes.

Accept indifference when it doesn't.

But don't allow someone else's response to decide the value of what was sincere in you.

Maybe that's the real lesson I carried away from that little Marathi chapter. I just needed several decades to understand it.

And perhaps that's what good education really does. Some lessons prepare you for an examination. The rare ones prepare you for life.


बोलावणं आल्याशिवाय नाही!

Still one of my favourite sentences. Still a little bit of me. And after all these years...

I still love it. 😊


“बोलावणं आल्याशिवाय नाही!” — आयुष्यभर माझ्यासोबत राहिलेला एक धडा

शाळेत आपण कितीतरी धडे शिकतो. काही धडे परीक्षा झाल्यावर विसरून जातो. पण काही धडे असे असतात, जे नकळत आपल्या मनात घर करून बसतात… आणि मग ते पुस्तक संपलं तरी आपल्याबरोबर आयुष्यभर चालत राहतात.

माझ्यासाठी असाच एक धडा होता —

“बोलावणं आल्याशिवाय नाही!”

हा धडा नेमका कोणत्या इयत्तेत होता, हे आज मला आठवत नाही. परीक्षेत त्यावर किती गुण मिळाले, हेही आठवत नाही. पण त्या धड्याचं शीर्षक मात्र आजही अगदी स्पष्ट आठवतं. - “बोलावणं आल्याशिवाय नाही!”

आणि गंमत म्हणजे, ते फक्त एका धड्याचं शीर्षक राहिलं नाही. ते हळूहळू माझ्या स्वभावाचा एक भाग बनलं.


तो मुलगा मला तेव्हा बरोबर वाटायचा

हा दिवाकरांचा नाट्यछटा प्रकारातला धडा होता. त्यातला मुलगा आपल्या कामाबद्दल, आपल्या कर्तृत्वाबद्दल खूप आत्मविश्वासाने बोलतो. त्याने काम केलंय, त्याला कौतुक मिळालंय, बक्षीस मिळालंय… त्यामुळे त्याला वाटतं की आपली किंमत आहे. पण जेव्हा त्याला अपेक्षित मान मिळत नाही, तेव्हा त्याची भूमिका अगदी स्पष्ट असते — “मला हवं असेल तर बोलवा. पण मी स्वतःहून येणार नाही.”

त्या वयात मला तो अजिबात अहंकारी वाटला नाही. उलट, मला तो स्वाभिमानी वाटला. माझ्या मनात तेव्हा एकच विचार यायचा — “आपण चांगलं काम केलं असेल, आपली गरज असेल, तर आपण कोणाच्या मागे का जावं?”

आणि नकळत मी ते मनावर घेतलं.


कधी ते माझं तत्त्व बनलं, कळलंच नाही

मोठा होत गेलो तसं हे वाक्य माझ्या आयुष्याचा एक छोटासा नियम बनलं. कोणाकडे उगाच काही मागायला मला आवडत नसे. विशेषतः अशी काही मदत, जी मला वाटायची की मागायलाच नको होती. उगाच “प्लीज करा ना…” म्हणत कोणाच्या मागे लागणं मला कधी आवडलं नाही. मनात कुठेतरी एक आवाज असायचा — “का म्हणून विनवणी करायची? योग्य असेल तर मिळेल. नसेल तर जाऊ दे.”

आणि हे फक्त कामापुरतं किंवा मित्रांपुरतं मर्यादित नव्हतं. मुलींच्या बाबतीतही हेच तत्त्व होतं! 😄

माझा तेव्हाचा साधा हिशेब होता — “मीच तिच्या मागे का जाऊ?” . मी चांगला असेन तर ती स्वतःहून येईल!” 😄

बरं… शाळेतल्या काळात तर कोणीच माझ्या मागे आलं नाही! 😂 पण नंतर आयुष्यात दोन-चार जणी आल्या हेही खरं. म्हणून माझा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा होता असंही म्हणता येणार नाही! 😄


मी बरोबर होतो का?

आज मागे वळून पाहताना खरं सांगायचं तर मला माहीत नाही. या विचारामुळे मी काय मिळवलं? आणि काय गमावलं?

कदाचित काही संधी मी स्वतःहून सोडल्या असतील. कदाचित काही नाती मी पुढे जाऊन जपली नसतील.

कदाचित कुठेतरी फक्त एक साधं “तू मला मदत करशील का?” एवढं विचारलं असतं, तर एखादं दार उघडलं असतं.

कदाचित काही वेळा मी स्वाभिमान आणि अहंकार यांच्यातला फरकच केला नसेल.

हे आता सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की. दुसऱ्याच्या स्वीकारासाठी मी स्वतःला कमी करण्याचा प्रयत्न फारसा केला नाही. आणि हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.


आज त्या मुलाकडे थोडं वेगळं पाहतो

आज मोठा झाल्यावर त्या नाट्यछटेतल्या मुलाकडे पाहतो तेव्हा वाटतं — कदाचित तो पूर्णपणे बरोबर नव्हता. त्याच्यात थोडा अति आत्मविश्वास होता. कदाचित स्वतःच्या महत्त्वाची जाणीव त्याला थोडी जास्तच होती. आणि त्याचं ते हट्टाचं वागणं हाच त्या नाट्यछटेचा गंमतीचा भागही असावा. पण त्या वयात मला त्यातला तो भाग दिसलाच नाही. मला दिसला तो एक मुलगा, ज्याला वाटत होतं की त्याच्यावर अन्याय होतोय. आणि त्याचा एक विचार मला अगदी पटला —

“माझी किंमत मला माहीत आहे.
माझी जागा मिळवण्यासाठी मी कोणाच्या मागे जाणार नाही.”

तो विचार माझ्यात कुठेतरी कायमचा राहिला. कदाचित दिवाकरांना तो धडा लिहिताना मला नेमकं हेच शिकवायचं नसेल. पण पुस्तकांचं असंच असतं ना?

लेखकाला जे सांगायचं असतं, तेच आपण शिकतो असं नाही.

कधी एखादं वाक्य, एखादा प्रसंग किंवा एखादं पात्र आपल्याला इतकं भिडतं की आपण त्यातून आपला स्वतःचा अर्थ तयार करतो.


हा स्वाभिमान की अहंकार?

हा प्रश्न आज मला स्वतःलाच पडतो. कारण दोघांमध्ये फरक खूप छोटा आहे.

स्वाभिमान म्हणतो —

“माझी किंमत मला माहीत आहे.
मला स्वीकारण्यासाठी मी कोणाकडे विनवणी करणार नाही.”

आणि

अहंकार म्हणतो —

“मला कोणाचीच गरज नाही.
मी कोणाकडे काही मागणारच नाही.”

बाहेरून दोन्ही सारखेच दिसू शकतात. पण फरक मोठा आहे. स्वाभिमान आपल्याला उभं ठेवतो. अहंकार कधी कधी आपल्याला लोकांपासून दूर करतो. कदाचित मोठं होणं म्हणजे याच दोन गोष्टींमधला फरक हळूहळू समजत जाणं.


पण “बोलावणं आल्याशिवाय नाही” आजही माझ्यात आहे

गंमत म्हणजे… इतकी वर्षं झाली तरी हा विचार माझ्यात अजून आहे. कोणाला माझी खरंच गरज असेल, तर मी नक्की जाईन. कोणी माझी किंमत ओळखून मनापासून बोलावलं, तर मी नक्की जाईन. पण फक्त आपली जागा सिद्ध करण्यासाठी, कोणाच्या मागे लागणं मला अजूनही आवडत नाही. कोणी मला स्वीकारावं म्हणून स्वतःला बदलणंही मला आवडत नाही. कोणी याला अहंकार म्हणेल.

म्हणू दे.

मला आजही त्या छोट्या वाक्याची गंमत आणि ताकद दोन्ही आवडतात. पण आज त्यात एक ओळ नक्की जोडेन —

“बोलावणं आल्याशिवाय नाही.
पण मनापासून बोलावलं असेल, तर अहंकार आड येऊ देऊ नका.”

कारण वय वाढल्यावर एक गोष्ट समजली —

काही मागणं म्हणजे नेहमीच भीक मागणं नसतं.

“प्लीज” म्हणणं म्हणजे नेहमीच झुकणं नसतं.

पहिलं पाऊल आपण टाकणं म्हणजे नेहमीच कमजोरी नसते.

कधी कधी आपणच पुढाकार घेणे म्हणजे फक्त एवढंच असतं — समोरच्याने “नाही” म्हटलं तरी ते स्वीकारण्याइतका आत्मविश्वास आपल्यात असणं.

आणि गंमत म्हणजे, “मला तुझी गरज आहे” हे मान्य करण्यासाठी कधी कधी “मला कोणाचीच गरज नाही” असं म्हणण्यापेक्षा जास्त धैर्य लागतं.


कदाचित त्या छोट्याशा धड्याने माझ्यासाठी काहीतरी चांगलंच केलं

“बोलावणं आल्याशिवाय नाही” हा आयुष्य जगण्याचा अगदी योग्य नियम होता का? कदाचित नाही. कदाचित त्यातून काही गोष्टी मी गमावल्या असतील. काही संधी. काही नाती. काही लोक. पण त्या धड्याने एका छोट्या मुलाला एक गोष्ट नक्की दिली —

स्वतःची किंमत जाणवण्याची भावना.

दुसऱ्याने आपल्याला स्वीकारलं नाही म्हणून आपण कमी होत नाही, हे कदाचित त्या वयात माझ्या मनात कुठेतरी रुजलं. आणि आजही, जेव्हा मी एखादा फोटो काढतो, काही लिहितो, काही तयार करतो किंवा मनातलं काही लोकांसमोर मांडतो, तेव्हा त्या जुन्या धड्याचा आवाज कुठेतरी ऐकू येतो —

“Like साठी विनवणी करू नकोस.”

तुला काही सांगायचं असेल तर सांग.

तुला काही निर्माण करायचं असेल तर कर.

लोकांनी कौतुक केलं तर आनंद घे.

कौतुक नाही केलं तर तेही स्वीकार.

पण दुसऱ्याच्या प्रतिक्रियेवर तुझ्या कामाची किंमत ठरू देऊ नकोस.

कदाचित त्या शाळेच्या छोट्याशा धड्यातून मी हेच घेऊन आलो. फक्त… हे समजायला मला काही दशकं लागली. 😊


शिक्षणाचं खरं सौंदर्य कदाचित हेच असावं. काही धडे परीक्षेसाठी शिकवले जातात. आणि काही धडे आयुष्यभरासाठी.

माझ्यासाठी —“बोलावणं आल्याशिवाय नाही!”

आजही माझ्या स्वभावाचा एक छोटासा भाग आहे. आजही माझ्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आणतं. आणि खरं सांगायचं तर…

आजही मला ते खूप आवडतं. 😊

Share
https://www.nileshteli.com/blog/blvanae-aalyashavaya-naha-the-lesson-that-stayed-with-me Copied
Previous Post Next Post
Comments
Thank you!
Latest Posts
We Teach Children How to Succeed. Do We Teach Them How to Live Healthy?
Oct 25, 2026
The Ground That Remembers
Oct 05, 2026
They Are Stronger Than I Think..
Oct 03, 2026
Subscribe to Newsletter
Follow me
We Teach Children How to Succeed. Do We Teach Them How to Live Healthy?
Oct 25, 2026
We Teach Children How to Succeed. Do We Teach Them How to Live Healthy?
The Ground That Remembers
Oct 05, 2026
The Ground That Remembers
They Are Stronger Than I Think..
Oct 03, 2026
They Are Stronger Than I Think..
HOME
ABOUT ME
PORTFOLIO
STORIES
GET IN TOUCH

©️ Nilesh Teli 2026 All rights reserved.

Made with Pixpa
Share
https://www.nileshteli.com/blog/blvanae-aalyashavaya-naha-the-lesson-that-stayed-with-me Copied